मुलांमध्ये मूत्रमार्गात संक्रमण (Urinary Tract Infections in Children)

मूत्रमार्गात संक्रमण |Urinary Tract infection | Dr. Vishesh Dikshit

मुलांमध्ये मूत्रमार्गात संक्रमण ही अत्यंत गंभीर व्याधी आहे.  हा आजार बराच काळ राहिल्यास त्याचा परिणाम  मुलांच्या मूत्रपिंडावर होऊ शकतो आणि आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेच या संदर्भातील लक्षणे आढळून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार घेणे फायद्याचे ठरते. प्रीमॅच्युर बेबी,नवजात अर्भक ज्यांना मूत्र प्रवाहात जन्मतः अडथळा  आहे  अशा मुलांना यूटीआय (Urinary tract infection) होण्याची खूप शक्यता असते. छोट्या मुलांना काय त्रास होत आहे हे ते स्वतः सांगू शकत नाही त्यामुळे आपणच या आजाराची लक्षणे कोणती आहेत, तसेच यावर कसे उपचार करायचे या विषयी जाणून घेऊया. यूटीआय (Urinary tract infection) होण्याची खूप शक्यता असते. छोट्या मुलांना काय त्रास होत आहे हे ते स्वतः सांगू शकत नाही त्यामुळे आz

मुलांमध्ये मूत्रमार्गात संक्रमण चे कारणे (Causes of urinary tract infections in children)

 • बऱ्याचदा लहान मुले लघवी करणे टाळतात.  लघवी थांबल्यामुळे मूत्राशय आकुंचन पावते व बॅक्टेरियाचा प्रसार होतो.
 • मूत्रमार्गाचा संसर्ग विषाणूंनी मूत्रप्रणालीमध्ये शिरकाव केल्याने होतो.
 • मूत्रमार्ग गुद्द्वाराच्या अगदी जवळ असणे.
 • फीटींग किंवा टाईट कपड्यांचा वापर करणे.
 • स्वेच्छेने लघवी थांबवणे किंवा अपुरे हायड्रेशन.
 • बद्धकोष्ठता (Constipation) हा आणखी एक घटक आहे, ज्यामुळे बॅक्टेरियाचा प्रसार होतो.

लक्षणे:

 • सिस्टिटिस (cystitis) म्हणजे लघवी करताना तीव्र वेदना आणि जळजळ होणे. कधी कधी मुलांना इतक्या वेदना होतात की ते लघवी   करणे टाळायला लागतात.
 • कधी कधी लघवी करताना  मुले जोर लावतात किंवा रडतात.
 • वारंवार आणि त्वरित लघवी करण्याची इच्छा किंवा  थेंब थेंब लघवी होणे.
 • लघवीचा रंग (ढगाळ)बदलणे किंवा विचित्र वास येणे.
 • कधी कधी लघवीतून रक्त येणे.
 • १०१ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी ताप.
 • ओटी पोटात दुखणे.
 • पाठीत तीव्र वेदना होणे आणि थंडी वाजणे.
 • मळमळ  उलट्या होऊन अन्नावरची वासना उडणे
 • अनेकदा मुलांना खेळावेसे वाटत नाही आणि त्याऐवजी  ते झोपून जातात म्हणजेच त्यांना एक प्रकारचा थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असतो.

उपाय:

 • भरपूर पाणी पिणे . मुलांना भरपूर पाणी पिण्यास प्रोत्साहित करा. हे कधीकधी प्रारंभिक सिस्टिटिस थांबविण्यासाठी पुरेसे ठरू शकते.
 • कोमट  पाण्याने अंघोळ करणे.
 • प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवणे, मुलींसाठी पुढून मागे पुसणे कारण मागून पुढे पुसल्यास संसर्ग अजून वाढतो.
 • कापडी डायपरचा वापर करणे.
 • बद्धकोष्ठता (Constipation) कमी करण्यासाठी फायबर युक्त वैविध्यपूर्ण आहार.
 • लघवी करण्यापासून परावृत्त करू नये.
 • जेव्हा मुले आईच्या दुधाशिवाय अर्ध-घन पदार्थ, घन पदार्थ आणि द्रवपदार्थ खाण्यास सुरूवात करतात तेव्हा त्यांना आम्लयुक्त पदार्थ आणि पेये देणे टाळावे.
 • बाळाला सौम्य रस, आईचे दूध, भाज्या आणि आम्लता नसलेली फळे द्यावीत .
 • या रोगाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, मुलांना  त्यांच्या दिनचर्येत बदल घडवून आणण्याची आवश्यकता असते

मुलांमध्ये मूत्रमार्गात संक्रमण आजार काही संसर्गजन्य नाही त्यामुळे योग्य तो उपचार करून मुले शाळेत जाऊ शकतात. दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये यूटीआयचे( Urinary tract infection) गंभीर नुकसान होण्याची अधिक शक्यता असते  कारण त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे हे ते स्वतः सांगू शकत नसतात. आणि म्हणूनच पालकांनी वर नमूद केलेल्या लक्षणंपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास यूटीआयचे निदान करून लवकरात लवकर उपचार केले पाहिजेत.

डॉ.विशेष दीक्षित

डॉ.विशेष दीक्षित हे पुण्यातील सर्वोत्कृष्ट बालरोग शल्यचिकित्सक आहेत. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील 17 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. डॉ.विशेष दीक्षित यांनी 2004 मध्ये शासकीय मेडिकल कॉलेज कालिकत, केरळ येथून एमबीबीएस पदवी घेतली. 2012 मध्ये त्यांनी सायन, मुंबई येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमधून जनरल सर्जरीमध्ये एमएस आणि 2015 मध्ये सायन, मुंबई येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमधून बालरोग शस्त्रक्रियामध्ये MCh .  पूर्ण केले.

डॉ.विशेष दीक्षित  त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच वर्षे सायन हॉस्पिटलमधील बालरोग शस्त्रक्रिया विभागात प्राध्यापक आणि प्रशिक्षक म्हणून काम केले. विशेषतः, त्यांना  Pediatric Minimal Access  शस्त्रक्रिया (लॅपरोस्कोपी, थोरॅकोस्कोपी आणि जेनिटोरिनरी-स्कोपीद्वारे), लहान मुलांचे कोलोरेक्टल रोग (हिर्शप्रंग रोग आणि एनोरेक्टल विकृतीसह), आणि बालरोग मूत्रविज्ञान रोगामध्ये अधिक अनुभव आणि कौशल्य  आहे.