मुलांच्यातील किडणी आणि मुत्रमार्गचा संसर्ग (Kidney and Urinary Tract Infections in Children in Marathi)

किडणी आणि मुत्रमार्गचा संसर्ग | UTI Treatment in Pune | Dr vishesh Dikshit

मुलांच्यातील किडणी आणि मुत्रमार्गचा संसर्ग  (Kidney and Urinary Tract Infections in Children) आजकालच्या बदलत्या जीवनशैली मुळे मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांच्यातील किडणी आणि मुत्रमार्गचा संसर्गचे आजार वाढू लागले आहेत. मुले अगदी लहान असली तर त्यांना किडणी किंवा मूत्रमार्गाचा संसर्ग (Urinary tract infection) झालाय हे उशिरा लक्षात येते आणि त्यावर पूर्ण उपचार न केल्यास त्याचा त्रास अधिक वाढू शकतो.  कधीकधी  किडणी पूर्णपणे खराब होण्याचीही  शक्यता असते. म्हणून घाबरून न जाता वेळीच सावध राहून लक्षणे आढळल्यास उपचार करणे योग्य ठरते. अनेक मुलांना वेगवेगळी लक्षणे आढळून येतात आज आपण कारणे आणि लक्षणे समजून घेऊयात.

मुलांच्यातील संसर्गाची लक्षणे(Symptoms of infection in children in Marathi)

 • दोन ते तीन वर्षाखालील मुले सतत चिडचिड करतात ,लघवी करताना रडतात.
 • मुलांना वारंवार ताप येण्याचे महत्वाचे कारण किडणी व मूत्रमार्गाचा संसर्ग (Urinary tract infection) हे असू शकते.
 • वजन वाढणे, उलटी होणे, जुलाब होणे,(diarrhea) कावीळ 9Jaundice) होणे अशी लक्षणेसुद्धा मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे लहान  मुलांमध्ये आढळून येतात.
 • भूक न लागणे, तापाबरोबरच  पोट फुगणे, वजन वाढणे किंवा गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाल्यास जास्त तापाबरोबर पोट फुगणे.

मुलांच्यातील किडणी आणि मुत्रमार्गचा संसर्गाची कारणे(Causes of Kidney & UTI in children in Marathi)

 • मुलांपेक्षा मुलींमध्ये संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते कारण मुत्रनलीकेची लांबी कमी असते. तसेच  मूत्रनलिका (Urethra) व गुदद्वार (anus) जवळ असल्यामुळे, मलमार्गातील जीवाणू मूत्रनलिकेत सहज जातात व संसर्ग (infection) होतो.
 • मलत्याग केल्यानंतर ती जागा स्वच्छ करण्याची क्रिया मागून पुढे अधिक वेळ  करण्याची सवय.
 • जन्मतः काही दोष असल्याने मूत्राशयातून लघवी उलटीकडे मूत्रवाहिनी किंवा किडणीकडे जाते त्यामुळे संसर्ग होतो.
 • अस्वच्छ शौचालये वापरल्याने सुद्धा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते.
 • किडणीच्या आतल्या बाजूला आणि मध्यभागातून खाली जाणाऱ्या भागाला-पेल्वीस (Pelvis) व मूत्रवाहिनीला जोडणाऱ्या भागाचे आकुंचन (Contraction) होऊन लघवीच्या मार्गात अडथळा येणे.
 • मूत्रनलिकेत व्हॉल्व (Urethral valve)असल्यामुळे कमी वयाच्या मुलांना लघवी करताना त्रास होणे.
 • मूत्रमार्गात मुतखडा (Kidney stones in the urinary tract) झाल्यास संसर्गाची शक्यता वाढते.
 • मूत्रमार्गाच्या संसर्गाचे (Urinary tract infection) निदान

लघवीच्या संसर्गाच्या (Uninary Tract Infection) निदानानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुलांच्यात संसर्गाची लक्षणे, त्याचे गांभीर्य व त्यांचे वय लक्षात घेऊन औषधे  दिली जातात.उपचार सुरू करण्यापूर्वी लघवीची करचर व सेन्सेटिव्हिटी तपासणी करणे आवश्यक आहे. या रिपोर्टच्या आधारे डॉक्टर निवडून संसर्गावर परिणाम कारक उपचार करू शकतात.

कमी वयाच्या मुलामध्ये संसर्ग (infection)गंभीर स्वरूपाचा असेल, तर काही  इंजेक्शने देणे आवश्यक असते.

या प्रकारचा उपचार साधारणतः ५ ते १० दिवसापर्यंत केला जातो. सर्गाबरोबरच संसर्ग (infection) होण्याच्या कारणाप्रमाणे पुढील उपचाराबद्दल निर्णय घेतला जातो.

डॉ.विशेष दीक्षित हे पुण्यातील सर्वोत्कृष्ट बालरोग शल्यचिकित्सक आहेत. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील 17 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. डॉ.विशेष दीक्षित यांनी 2004 मध्ये शासकीय मेडिकल कॉलेज कालिकत, केरळ येथून एमबीबीएस पदवी घेतली. 2012 मध्ये त्यांनी सायन, मुंबई येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमधून जनरल सर्जरीमध्ये एमएस आणि 2015 मध्ये सायन, मुंबई येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमधून बालरोग शस्त्रक्रियामध्ये MCh .  पूर्ण केले.

डॉ.विशेष दीक्षित त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच वर्षे सायन हॉस्पिटलमधील बालरोग शस्त्रक्रिया विभागात प्राध्यापक आणि प्रशिक्षक म्हणून काम केले. विशेषतः, त्यांना  Pediatric Minimal Access  शस्त्रक्रिया (लॅपरोस्कोपी, थोरॅकोस्कोपी आणि जेनिटोरिनरी-स्कोपीद्वारे), लहान मुलांचे कोलोरेक्टल रोग (हिर्शप्रंग रोग आणि एनोरेक्टल विकृतीसह), आणि बालरोग मूत्रविज्ञान रोगामध्ये अधिक अनुभव आणि कौशल्य  आहे.